अमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच

अमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांचा पहिला पंजाबी भाषिक म्युझिक अल्बम लॉंच झाला आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी याची माहिती ट्विटरवरील पोस्ट द्वारे दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी या अल्बममध्ये पंजाबी/बॉलिवूड मिक्स गाणी गायली आहेतता त्याच्या चाबत्याना पहेयला मिळणार आहेत. यू-ट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्याने लाखो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पंजाबी अंदाजाचं सोशल मीडियावर कौतुक ही होत आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘पाहा आणि ऐका धम्माल गाणं साड्डी गली/रेल गड्डी’. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी हिंदी अल्बममध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे.

‘साड्डी गली/रेल गड्डी’ असं अमृता फडणवीस यांच्या पंजाबी अल्बमचं नाव आहे. टी-सीरिजकडून सुमारे चार मिनिटांचा हा अल्बम रिलीज केला आहे. अल्बममध्ये पंजाबी गायक दीप मोनी आणि प्रीत हरपाल यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत आपला आवाज दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version