‘शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे’ – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

‘शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे’ – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

राज्यातील मराठावाडा-विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 5 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत परतीचा पाऊस पुन्हा एकदा झोडपून काढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषीखात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे. अशी माहिती शेतकऱ्यांना पोहोचवण्यात यावी असे आदेश फुंडकरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

 

तसेच, विजांसह पावसाची शक्यता असल्यानं मोकळ्या पटांगणात, झाडाखाली अथवा विजेच्या खांबांजवळ उभे राहण्याचे टाळा अशी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका राज्याला बसला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून दक्षता घेतली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version