‘ती’ नेमकी आहे कशी, याची कुणालाच कल्पना नाही… कुणी ‘तिला’ पाहिलंही नाही… पण ‘तिचं’ अस्तित्व जाणवतंय. ‘तिच्या’मागे सगळी यंत्रणा लागलीय. पण ‘ती’ मात्र एखाद्या दंतकथेसारखी गूढच बनून राहिली आहे… ‘ती’ आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागात 13 लोकांचे बळी घेणारी T1 ही नरभक्षक वाघीण…
T 1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचा 6 कोटींचा खर्च, मोहीम लांबल्यास हा आकडा 10 कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एवढे पैसे खर्च करूनही या वाघिणीचा साधा फोटोसुद्धा वन विभागाला मिळवता आला नाही. T1 या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेले 44 दिवस ऑपरेशन सुरू आहे, सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या या ऑपरेशन मध्ये दिवसागणिक घोळ होत गेले. या संदर्भात हाय कोर्टात 2 वेळा याचिका सुद्धा दाखल करण्यात आली.
वादग्रस्त ठरलेलं हे ऑपरेशन कधी शार्प शूटर नवाबमुळे तर कधी पिसाळलेल्या हत्तींमुळे चांगलंच गाजलं. वन विभागाच्या गलथनपणाचा फायदा वाघिणीला मिळाला असून तिने तर आता जंगलातून पलायन केल्याचा अंदाज व्याक्त केला जातोय.
खरंतर हे ऑपरेशन उन्हाळ्यात सुरू केलं असतं तर या ऑपरेशनला इतके दिवस आणि खर्च आला नसता. वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उन्हाळ्यात हे ऑपरेशन न राबवता पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आलं.
उन्हाळ्यात ऑपरेशन सुरू केलं असतं तर तीन लोकांचे नाहक बळी गेले नसते.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात राबवलं जाणारं हे जगातील पहिलं ऑपरेशन आहे.
200 कर्मचारी,
50 वाहनं
हत्ती,
विदेशी कुत्रे
यांच्या माध्यमातून ऑपरेशन राबविल गेलं.
आश्चर्य म्हणजे 6 कोटी खर्च आणि 44 दिवस सलग सुरू असलेल्या ऑपरेशन मध्ये अजून एकदा ही वाघिणीचा साधा फोटो सुद्धा वन विभागाला मिळू शकला नाही. ऑपरेशन याच संथ गतीने सुरू राहिलं तर T1 वाघिणीला पकडण्यासाठी हा खर्च 10 कोटीच्या घरात गेला तरी आश्चर्य करायला नको.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.