बेकायदेशीर ऑनलाईन नोटा विक्री सुरुच

बेकायदेशीर ऑनलाईन नोटा विक्री सुरुच

वृत्तसंस्था, मुंबई

नोटा विकणे बेकायदेशीर असतानाही ऑनलाइन नोटा विकणे सुरु असल्याचं समोर आलंय. ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवर नोटा विक्रीला ठेवल्यामुळे एकच खळबळ उडालीय. नोटा ऑनलाईन विक्रीमुळेच ATMमध्ये नोटांचा दुष्काळ असल्याचे बोललं जातंय. ‘ईबे डॉट इन’वर 10 रुपयाचे एक बंडल 1620 रुपयांना, 200 रुपयाचे एक बंडल 26 हजार रुपयांना मिळतंय तर एक रुपयाचं बंडल 555 रुपयांना मिळतं.

या नोटा घरी मागवल्यास त्यावर 50 ते 100 रुपये शिपिंग चार्ज द्यावा लागतो. सध्या लग्नाचा मोसम सुरू असल्यामुळे 10, 50 आणि 200 रुपयांच्या नोटांना मोठी मागणी आहे. ऑर्डर दिल्यावर 2 ते 3 दिवसांत नोटा ग्राहकाला मिळतात, अशी माहिती समोर येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version