कांदाप्रश्नी विरोधक आक्रमक

कांदाप्रश्नी विरोधक आक्रमक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत आंदोलन केले.

मंगळवारी, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा आणि कापूस उत्पादकांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यावरती आंदोलन केले. हातात फलक, गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर कांद्यांची टोपली घेत आंदोलकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मविआ आमदारांनी घोषणाबाजी केली.
सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करावी तसेच कांद्याची खरेदी तातडीने सुरू करावी, या मागण्या विरोधी पक्षाकडून करण्यात आल्या. तसेच कांद्याबरोबरच कापूस, द्राक्ष आणि इतर शेतमालाचे भाव वाढण्यासाठी सरकारने तात्काळ उपाय योजावेत,अशी भूमिकाही यावेळी विरोधी पक्षाकडून मांडण्यात आली.
गेल्या महिन्यापासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे त्यामुळे, जागोजागी निदर्शने करूनही कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर आमदार सहभागी होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version