पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद

पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद

नाशिक, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत.

बाजार समितीत कांद्याला भाव कमी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. नाफेडकडून २४१० रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर देण्यात येत आहे. नाफेडने ठरवलेला दर बाजार समितीत मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत.

याआधी केंद्र सरकारने निर्यातीसाठीच्या कांद्यावर ४० टक्के कर लागू केला. या निर्णयाला विरोध म्हणून व्यापारी संघटनांनी कांद्याचे लिलाव सलग तीन दिवस बंद पाडले होते. केंद्र सरकारने २४१० रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची तयारी दाखवली. यानंतर व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखवली. पण लिलावाच्या वेळी नाफेडचे अधिकारी अनुपस्थित होते आणि व्यापारी संघटनांनी २४१० पेक्षा कमी दर देण्याची तयारी दाखवली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version