जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार?

जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात जुलैमध्ये पुढील सुनावणी होणार आहे. 

 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा जमा करण्यास केंद्र सरकारनं 30 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अनेकांना जुन्या नोटा जमा करता आल्या नाहीत. या नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

 

देशभरातून यासंबंधीच्या सुमारे डझनभर याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रितपणं सुनावणी करण्यात येतंय..या याचिकाकर्त्यांनी विविध कारणांमुळं आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत जुना नोटा जमा करता आलं नसल्याचं म्हटलं. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version