संजय राऊत यांच्याकडून अश्लील शेरेबाजी; मुंबई पोलिसात तक्रार दाखल

संजय राऊत यांच्याकडून अश्लील शेरेबाजी; मुंबई पोलिसात तक्रार दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात तसेच स्त्रीयांविरोधात अश्लील शेरेबाजी केल्यामुळे त्यांच्याविरोधात मुंबई भाजप महिला मोर्चेतर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते तसेच महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३५४ ए (१) आणि (४), ५०९, ५०४, ५०० या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजप महिला मोर्चेतर्फे करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी अश्लील शेरेबाजी करत भाजपच्या सर्व महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केला आहे असून त्यांची प्रतिमा मलीन केली आहे. असे भाजप महिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version