‘आता हिंदू मार खाणार नाही’ – अनिल बोंडे

‘आता हिंदू मार खाणार नाही’ – अनिल बोंडे

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यानंतर दुसऱ्य दिवशी भाजपकडन अमरावती बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना जामीन मंजूर झाला असून त्यांची सुटका करण्यात आली. आज झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीमध्ये अनिल बांडे यांनी ‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत भाजपा प्रदेश कार्यकारिणीत पाटलांचे अनिल बोंडे यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. तसेच आता हिंदू मार खाणार नाही असेही अनिल बोंडे यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version