मुंबई, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या ‘लक्षवेधी’ या प्रसिद्ध कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज पुन्हा एकदा सविस्तर चर्चा झाली. ‘मराठवाड्यावर दुष्कालाचे ढग’ या विषयावरील चर्चेत शेतकरी नेते माणिक कदम आणि कृषितज्ज्ञ अजित नवले सहभागी झाले. यावेळी दोन्ही सदस्यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर जय महाराष्ट्र शिवाय कोणीही चर्चा करत नाही असे शेतकरी नेते माणिक कदम म्हणाले.
मराठवाडा हा महाराष्ट्रातला पाण्याची कायम टंचाई असलेला भाग आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढत शेती करणे, पिके जगवणे ही कामं शेतकरी करत आहेत. त्यांना सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे. भारतात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी ३५ आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. अनेकदा शेतकरी जोडपी नैराश्यातून आत्महत्या करतात. त्यांची मुलं अनाथ होतात. हे प्रश्न मराठवाड्यात अतिशय गंभीर आहेत. यामध्ये राज्य शासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे. सध्या फक्त ‘जय महाराष्ट्र’ ही वृत्तवाहिनीच या गंभीर प्रश्नांमध्ये लक्ष घालत असल्याचे शेतकरी नेते माणिक कदम म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.