जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाण्यात आरटीओ कार्यलय आणि त्याचे अधिकारी त्यांच्या विविध कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. असाच एक धक्कादायक कारनामा या अधिकाऱ्यांनी केलाय. तो म्हणजे बोगस वाहनांचे रजिस्ट्रेशन विशेष म्हणजे या इमानदार अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर या वाहनांचे रजिस्ट्रेशन केले आहे.
आर टी ओ कार्यालायच्या अधिकाऱ्यांनी वाहनांचे रजिस्ट्रेशन करताना कोणतेही कागदपत्र न पाहता आणि वाहनांची तपासणी न करता ह्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करून सर्वांना आशचर्याचा धक्का दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.