नारायण राणेंच्या भाजप एंट्रीवरून गोंधळ सुरूच

नारायण राणेंच्या भाजप एंट्रीवरून गोंधळ सुरूच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असल्याच्या अफवांना जरी उधाण आलं असलं तरी त्याबाबतचा अजून ठोस पुरावा समोर आलेला नाही. काही दिवसेपूर्वी खुद्द राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांसह अमित शहा यांनी नारायण राणेंची भेट घोतली होती.

इतकंच नाही तर आता राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही तसं ट्विट करुन, राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं आणि अजून बराच काळ थांबावं, महाराष्ट्रातील जनतेला त्यांची गरज आहे… आम्हाला त्यांना राज्यासभेत पहायच नाही तर विधानसभेत पहायच आहे… त्यांनी दिल्लीत जाऊ नये आशा आहे की ते समजून घेतील…. असं म्हटलं आहे.

 

त्यामुळे नारायण राणेंची ऍंट्री भाजपमध्ये होणार की नाही याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली. २३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपला यात ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा राणेंना देऊन राणेंना दिल्लीत राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version