Sindhudurg Airport : कोकणच्या पर्यटनाला चालना! चिपी विमानतळाबाबत मोठा निर्णय

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'ऑल वेदर ऑपरेशन्स' श्रेणीमध्ये अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या विमानतळाला आता 'IFR' परवाना मिळाल्यामुळे 24 तास विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sindhudurg Airport : कोकणच्या पर्यटनाला चालना! चिपी विमानतळाबाबत मोठा निर्णय

Chipi Airport Night Landing : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमान प्रवासाच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चिपी विमानतळाला 'ऑल वेदर ऑपरेशन्स' श्रेणीमध्ये अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे आता केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळी आणि खराब हवामानातही येथे विमानांचे लँडिंग करणे शक्य होणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या सुविधेमुळे कोकणातील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

नाईट लँडिंग आणि तांत्रिक सुधारणा
सिंधुदुर्ग विमानतळाला आता 'IFR' परवाना मिळाल्यामुळे 24 तास विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाच्या टप्प्यासोबतच विमानतळाची पार्किंग क्षमताही दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी येथे केवळ 3 विमाने उभी करण्याची सोय होती, ती आता वाढवून 6 करण्यात आली आहे.

हेही वाचा – Narayan Rane: भरसभेत नारायण राणेंना भोवळ, निवृत्तीच्या चर्चांना उधाण

रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेला अखंडित वीजपुरवठा आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी नारायण राणे, नितेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे.

पर्यटकांचा ओघ आणि भविष्यातील संधी
कोकणात डिसेंबर महिन्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, ज्याचा प्रत्यय गेल्या महिन्यातच आला. डिसेंबरमध्ये तब्बल 11,000 प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केल्याची नोंद झाली असून, यामुळे या विमानतळाने देशातील 75 प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळवले आहे. पूर्वी केवळ दिवसाच विमाने उतरत असल्याने पर्यटकांच्या प्रवासाचे नियोजन मर्यादित होते; मात्र, आता रात्रीची सेवा सुरू झाल्याने मुंबई-सिंधुदुर्ग या थेट विमानफेऱ्या नियमितपणे आणि अधिक सोयीस्करपणे उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा – Airoli-Katai Naka Freeway : आनंदाची बातमी! ऐरोली-कटाई नाका मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण; प्रवासाचा वेळ वाचणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version