एअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ

एअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ

वृत्तसंस्था, मुंबई

एअर इंडियाचं अमृतसर-दिल्ली विमान हवेत असतानाच एअर टर्ब्युलन्समुळे मोठा गोंधळ झाला. विमानातील खिडकीचं पॅनल खाली पडल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाल्याने तीन प्रवासी जखमी झालेत. या सर्व प्रकारामुळे प्रवासी भयभित झाले.

एअर इंडियाचं AI 462 हे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरुवारी अमृतसरहून दिल्लीला जात होतं. त्यावेळी 10 ते 15 मिनिटे हवेच्या दाबामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

विमानाला काहीसे हादरे बसले असता एका प्रवाशाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचं डोकं लगेज केबिनवर आदळल्याचं देखील समजतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version