नेहा धुपिया आणि अंगदची ‘सिक्रेट वेडिंग’

नेहा धुपिया आणि अंगदची ‘सिक्रेट वेडिंग’

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्याला कारणही तसेच आहे. सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असतानाच आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे, तिचे नाव आहे नेहा धुपिया. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहाने ही पंजाबी धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. नेहा धुपिया आणि अंगदने ‘सिक्रेट वेडिंग’नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली.

 २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. अंगदही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version