वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या दहशतीची परिसीमा दर्शविणारी घटना घडली आहे. एक अख्खे प्रगतिशील शेतकरी कुटुंब यामुळे जिल्हा मुख्यालयी पळून आले आहे. धानोरा तालुक्यातील ‘भटमरयान’ गावातील ही धक्कादायक घटना आहे.
28 एकर शेती सोडून 11 सदस्यांचा परिवार पोलिसांच्या दारी पोहोचला आहे. नक्षलवाद्यांनी कुटुंब संपविण्याची धमकी दिली असून सधन शेतक-यांच्या प्रगतीवर जळून त्यांना मानसीक त्रास देऊन हळ काढण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. गावातील काहींनी नक्षल्यांना टीप दिल्याचे पोलिसांचे मत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हे कुटुंब स्वतःहून पोलिसांकडे मदतीसाठी आले आहे. पोलीस अधिक्षकांनी कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देऊ केली असून सध्या हे कुटुंब सुरक्षित असल्याची ग्वाही दिली जातेय.
गावातील काही लोकांनी उत्तम शेती कसून संपन्न झालेल्या या परिवाराच्या विरोधात नक्षल्यांना भडकविल्याने हे प्रकरण घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.