युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत राणांनी दिला धीर

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत राणांनी दिला धीर

रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. या तणावाच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये अनेक भारतीय रहिवासी आणि विद्यार्थी अडकले आहे. यामध्ये अमरावतीमधील ८ विद्यार्थी यक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा स्थितीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फोनद्वारे संवाद साधला.

अमरावतीचे खासदार नवनीन राणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील अभिषेक बारद्धे आणि तुषार गंधे विद्यार्थ्यांशी मोबाईल फोनद्वारे संवाद साधला. नवनीत राणा यांनी फोनद्वारे विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकार तुम्हाला लवकरच मायदेशी परत आणणार, काळजी करू नका असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.

युक्रेनमधील २५० भारतीय विद्यार्थी रोमानियात

युक्रेनमधील २५० भारतीय विद्यार्थी रोमानियात दाखल झाली असून या विद्यार्थ्यांना दिल्लीला आणण्यात येणार आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी आणण्या आले असून सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version