जंगल सफारीसाठी उन्हाळा हा सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. पाण्यासाठी वन्यप्राणी बाहेर येत असल्याने त्यांचे दर्शन होते, असे सांगितले जाते. त्यामुळेच या काळात नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोठी गर्दी असते. मात्र, पावसाळ्यात प्रकल्पातील रस्ते वाहन चालविण्यासाठी अयोग्य असतात. शिवाय हा काळ प्रजननाचा काळ असल्याने व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाते. त्यानुसार, यंदाही १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सध्या १५ ते ३० जून या कालावधीत पर्यटकांना फक्त ऑफलाइन स्पॉट बुकिंगनेच प्रवेश दिला जाणार आहे. त्यातही या काळात अत्याधिक पाऊस होऊन रस्ते नादुरुस्त झाल्यास प्रवेश बंदी केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.