Pune Navale Bridge : नवले ब्रिज पुन्हा चर्चेत! तरुणांनी भररस्त्यात केला तो प्रकार; महिलांनी पाहताच…; VIDEO समोर

पुण्यातील प्रसिद्द नववे ब्रिज परिसरात रील्स बनवण्याच्या नादात काही तरुणांकडून चक्क जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार नुकताच समोर आलेला आहे.
Pune Navale Bridge : नवले ब्रिज पुन्हा चर्चेत! तरुणांनी भररस्त्यात केला तो प्रकार; महिलांनी पाहताच…; VIDEO समोर

पुण्यातील प्रसिद्द नववे ब्रिज परिसरात रील्स बनवण्याच्या नादात काही तरुणांकडून चक्क जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार नुकताच समोर आलेला आहे. पुणे-मुंबई हायवेवर धावत्या रिक्षाच्या टपावर बसून दोन ते तीन तरुण हा स्टंट करताना दिसून आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रस्ते  सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, पुणे-मुंबई हायवे असून दोन्ही बाजूंना वाहनांची ये-जा होत आहे , याच वेळी या तरुणांनी धावत्या रिक्षाच्या टपावर बसून स्टंट केला आहे. फक्त सोशल मीडियासासाठी रील्स बनवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासोबत त्यांनी इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला होता. त्यावेळी रस्त्यावर एखादे वाहन अचानक समोर आल्यास किंवा रिक्षाचा वेग बदलल्यास गंभीर अपघातही होऊ शकला असता. रील्ससाठी अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यांवर  स्टंट करणे अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, त्यामुळे अशा प्रकारे जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version