जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत तर दुसरीकडे अनेक घटनांमध्ये सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींपर्यंत पोलीस पोहोचतात. त्यामुळेच चोर देखील आता सतर्क झाले आहेत. नाशिकच्या कामगार नगर भागात एका घटनेनं हे स्पष्ट झालं आहे. चित्रपटासारखा काहीसा सीन नाशिक शहारातल्या कामगार नगर भागातील एका मोबाईलच्या दुकानात घडला आहे.
चोरट्यांनी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे चेहऱ्याला मास्क लावून आणि हातात ग्लोव्हज घालून मोबाईलच्या दुकानात चोरी केली आहे. यावेळी चोरट्यांनी तब्बल 79 महागड्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर डल्ला मारला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून 15 ते 20 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला. दरम्यान, याप्रकरणी आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.