जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक मनपा महासभेत गोंधळ झालेला पाहायला मिळालाय. विषय तसेच तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला होता.
यावेळी सभेतील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व प्रकार पाहता महापौरांनी राष्ट्रगीताला सुरुवात करत सभा आवरली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.