द्राक्ष खरेदी करून धुर्त व्यापाऱ्याचा पोबारा, नाशिकमधील घटना

द्राक्ष खरेदी करून धुर्त व्यापाऱ्याचा पोबारा, नाशिकमधील घटना

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशकातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोलकात्यातील एका व्यापाऱ्याने 70 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करुन पैसे न देताच या धुर्त व्यापाऱ्याने पोबारा केलाय.

या व्यापाऱ्यांनं शेतकऱ्यांना 15 दिवसानंतरच्या तारखेचे चेक दिले. पण दिलेल्या तारखेला चेक पास न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. अखेर नाशिकच्या निफाड पोलीस ठाण्यात संबंधित व्यापऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या व्यापाऱ्याचा पोलीस शोध घेत असून आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती झालीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version