नाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

नाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

नाणारमध्ये होणाऱ्या या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे.या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांचा याला विरोध असेल तर तो होणार नाही असे म्हटले होते. मात्र, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आणि हा प्रकल्प राज्याच्या अधिक फायद्याचा असल्याचं म्हटलं. त्यामुळे ग्रामस्थ आता आणखीच आक्रमक झालेत. नाणारचे ग्रामस्थ आज शरद पवारांची भेट घेणार आहेत .त्यामुळे आता या प्रकल्पात नारायण राणे आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉग्रेससही उडी घेतलीय. त्यामुळे या भेटीनंतर शरद पवारांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version