माझी प्रकृती ठणठणीत – नाना पटोले

माझी प्रकृती ठणठणीत – नाना पटोले

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. मविआच्या या सभेला उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस या तीनही पक्षांचे बडे नेते उपस्थित राहिले. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गैरहजेरी लावली. दरम्यान, नाना पटोले यांनी मविआच्या सभेत गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोलेंची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभेला गैरहजर राहिले. याबाबत नाना पटोले यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहेत. प्रकृती ठीक असून मी स्ध्या सूरतमध्ये असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

मविआच्या सर्वात मोठ्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित न राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मविआच्या सभेला अनुपस्थित राहून नाना पटोले दिल्लीत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, नाना पटोलेंनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी सध्या सूरतमध्ये असून माझी प्रकृती ठीक असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

येत्या १६ एप्रिल रोजी नागपुरातही मविआची जाहीर सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची सभा पार पडणार आहे. सुनील केदार, नितीन राऊत,अभिजित वंजारी यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. नागपुरात पार पडणाऱ्या सभेच्या तयारीसाठी काँग्रेसची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या संभाजीनगरमधील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे नागपुरात होणाऱ्या मविआच्या सभेत पुन्हा पटोलेंची गैरहजेरी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version