सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका ?

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका ?

राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर महापालिका निवडणूका नक्की कधी होणार ? याच्या नव्या तारखा समोर आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. काही महापालिकांचा कार्यकाळ तर कोरोना काळातच संपला आहे. पण तरीही निवडणूक आयोगाकडून अद्याप महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठक पार पडली आहे. या बैठकीत पुण्यातील भाजपचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याचे लक्ष ठेवण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version