मुंब्रा-बायपास रस्ता दुरुस्तीमुळे दोन महिन्यांसाठी बंद

मुंब्रा-बायपास रस्ता दुरुस्तीमुळे दोन महिन्यांसाठी बंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईकरांना वाहतूकीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. मुंब्रा-बायपास हा रस्ता दुरुस्तीमुळे दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्याचं दुरुस्तीचं काम 16 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
मुंब्रा बायपासवर पडलेल्या खड्ड्यांमुळे इथं अनेकदा अपघात होतात. तसंच या रस्त्याखालून मध्य रेल्वे जाते, तो ब्रीज अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार असून त्याचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना होणार आहे.

ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत, नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. मुंब्रा बायपासचे काम याच महिन्यात 16 एप्रिलला सुरु होईल. तब्बल 2 महिने हे काम चालणार असून वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येईल. ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक ही ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर वळविण्याचा पर्याय वाहतूक विभागासमोर आहे. तर दुसरा पर्याय शीळफाटामार्गे कल्याणवरुन भिवंडीला जाणे हा आहे.

चार चाकी वाहने, तीन चाकी आणि दुकाची चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असेल. जी वाहने दिवसा प्रवास करु शकत नाहीत, त्यांना पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच मनपाच्या ट्रक टर्मिनलच्या रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी दिल्या जाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version