यंदाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लांबले

यंदाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लांबले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परीक्षा संपून दोन महिने झाले तरी मुंबई विद्यापीठाच्या 400 हून अधिक विषयांच्या संगणकीय मूल्यांकनाच्या कामाने जोर पकडला नसल्याने निकालांच्या रखडपट्टीची मालिका यंदाच्या वर्षीही सुरूच राहणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

 

मूल्यांकनाचे काम फारच लांबल्याने यंदा जुलै महिन्याच्या आधी एकाही महत्त्वाच्या विषयाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही. 28 एप्रिलला विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मार्च-एप्रिल या पहिल्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व विद्या शाखांच्या विविध 406 परीक्षांच्या 22 लाख उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला.

 

त्यासाठी ‘मेरीटट्रॅक’ या तांत्रिक सहकार्य पुरविणाऱ्या कंपनीची निवडही केली. परंतु एक महिना होत आला तरी 22 लाखांपैकी केवळ 50 हजार उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन होऊ शकले आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाला परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत काही करून निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांनाच आता हरताळ फासला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version