Vande Bharat Express Stuck : वंदे भारत एक्स्प्रेस कसारा घाटात अडकली! बोगद्यात अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कसारा ते इगतपुरी या तीव्र उताराच्या घाट क्षेत्रातून जात असताना अचानक ओव्हरहेड वायरच्या इन्सुलेटरमध्ये बिघाड झाला.
Vande Bharat Express Stuck : वंदे भारत एक्स्प्रेस कसारा घाटात अडकली! बोगद्यात अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कसारा ते इगतपुरी या तीव्र उताराच्या घाट क्षेत्रातून जात असताना अचानक ओव्हरहेड वायरच्या इन्सुलेटरमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा घाटातील बोगद्यात वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. दरम्यान बोगद्यात रेल्वे बंद पडल्याने वातानुकूलित यंत्रणा प्रभावित झाली यामुळे काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास निर्माण झाला.

हेही वाचा- Virar-Bharuch MEMU: विरारहून भरूचकडे जाणाऱ्या ‘मेमू’ ट्रेनचा डबा घसरला; पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वंदे भारत एक्सप्रेस एक तास घाटातच उभी राहिली होती. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडीओ ‌ट्विट करण्यात आला होता. ज्यामुळे या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एक तासाने विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने वंदे भारत नाशिकच्या दिशेने रवाना झाली.

या तांत्रिक समस्येमुळे ट्रेनला सुमारे 32 मिनिटांचा उशीर झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र डाऊन मार्गाच्या गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळविल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दरम्यान या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास काही काळ विस्कळीत झाला. रेल्वे प्रशासनाच्या जलद कारवाईमुळे दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण झाले आणि प्रवाशांचा पुढील प्रवास सुरक्षितपणे सुरू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version