काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात २००४ साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. २००९ साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं, त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं. काँग्रेसमध्ये असताना मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.
‘भाजप या देशाला नंबर १ चं स्थान देईल म्हणून ते भाजपमध्ये आले आहेत’, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.