मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून १ हजाराच्या खाली आली असून मंगळवारी मुंबई महापालिका क्षेत्रात ५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील मृतांचा आकडाही कमी होत असून आज आणखी १४ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

मुंबईतील कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडासुद्धा वाढत आहे.

मंगळवारी १४ रुग्ण कोरोनामुळे दगावल्याने मृतांची एकूण संख्या आता १५ हजार २१६ इतकी झाली आहे, तर मुंबईचा कोविड रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका झाला आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७०२ दिवसांवर गेला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version