मुंबई पोलिसांच्या गैर वर्तणूकीचा व्हिडीयो वायरल

मुंबई पोलिसांच्या गैर वर्तणूकीचा व्हिडीयो वायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ रविवारी रेल्वे अपघातात एक जण जखमी झाला होता. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या इसमाने तत्परता दाखवत जखमी व्यक्तीला तात्काळ सैफी रुग्णालयात दाखल केलं आणि माणूसकीच कर्तव्य निभावलं.

मात्र, रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केल्यानंतर पोलिसांनी मदत करणाऱ्या व्यक्तीला झापल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी मदत करणाऱ्या श्रवणलाच झापलं. कुणाच्या परवानगीनं जखमीला मदत केली? असा सवाल पोलिसांनी विचारला आणि हा सगळा प्रकार कॅमऱ्यात कैद झाला आहे.
खरं तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाजा इसम जखमी असेल किंवा एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला तातडीची मदत करणं आवश्यक आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जाणार नाही असंही कोर्टानं बजावलं आहे. तरीही मुंबई पोलिसांकडून मात्र मदत करणाऱ्या श्रवणलाच त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करणार असल्याचं समजतं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version