औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात एमआयएम आणि इतर काही संघटनांच्या वतीने आज शहरातील भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्हा नामकरणाविरोधी कृती समितीचाही या मोर्चात सहभाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला आहे.या मोर्च्या दरम्यान इम्तियाज जलील यांनी भाषण करताना म्हणाले आहेत कि निर्णय घ्यायचा होता तर २०१४ मध्ये सत्ता आली त्यावेळी का घेतला नाही, देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालेल आम्ही मंत्री आहे आणि औरंगाबादच्या लोकांनी मान्य करावा लागेल असे वाटत असेल तर उद्धव बाबा यांनी आमच्या नादी लागू नये. ठरवायचे असेल तर ते औरंगाबादची जनता ठरवेल. सर्व जातीचे लोक या मुद्द्यावर जोडले गेले आहेत. राजनीती सुरू आहे.
आमच्यावर निर्णय लादले जात आहेत.आमच्यावर जबरदस्ती केली जात आहे.असे इम्तियाज जलील यांनी आरोप केले आहेत, राजकारण करण्यासाठी आम्ही महापुरुषांची नाव घेत नाही असे देखील इम्तियाज जलील म्हणाले आहेत. हे सगळे बोलत असताना त्यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे शरद पवार जी झुट बोले कव्वा काटे आम्ही आता करणार नाही, तुम्ही बस म्हणले बसले आणि उठ म्हणले उठले असे होणार नाही. आम्ही संभाजी महाराजांचा अवमान करत नाही, चारशे वर्षांपूर्वी इतिहासात काय झाले माहीत नाही. मात्र आज बेरोजगारांना रोजगार हवा आहे. युवक नोकरी मागत आहे तर तुम्ही शहराच नाव बदलून देत आहे. शहराला पाणी नाही. उद्धव ठाकरे माझेपण मुख्यमंत्री होते. त्यांनी आधी शहराचा विकास करू आणि नंतर नामांतर करू अस म्हणले होते. अचानक कोणती जादूची कांडी फिरवली. जे लोक बापाला बाप म्हणायला तयार नाही ते आमचा उद्धार करायला निघाले आहेत.जे आले नाहीत त्यांना पण आम्ही लक्षात ठेवू. शहराच्या अस्तित्वाच्या मुद्द्यावर सोबत नाही आले त्यांची तर वाट लागणार आहे. कोणत्या एका पक्षाचे नाव घेत नाही.असं सूचक वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.