अखेर मान्सून केरळात दाखल

अखेर मान्सून केरळात दाखल

दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं. यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये गुरुवारी (८ जून २०२३) हजेरी लावली. तर, मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे.

अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिली आहे. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version