येत्या एक जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे जयस्तंभ स्मृतिदिन साजरा करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. शुक्रवारी विधान परिषदेत या संदर्भातले वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. मात्र, त्या विधानाचा स्थानिक पातळीवर निषेध करण्यात येत आहे.
जयस्तंभ आवाराच्या मूळ कब्जेदाराचे सातवे वंशज ऍड. रोहन जमादार-माळवदकर यांनी मंत्री मुंडे यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांचे हे विधान म्हणजे न्यायालयाची अवमानना, असे ठाम मत जयस्तंभाच्या कब्जेदाराने केले आहे. जयस्तंभ आवाराच्या मूळ कब्जेदारीचा वाद न्यायप्रविष्ट असताना मंत्री मुंडे यांनी केलेली घोषणा न्यायालयाचा अवमान ठरत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
स्मृतिदिनाच्या निमित्त जयस्तंभ आवाराच्या कब्जाचा वाद आता चर्चेचा विषय ठरणार आहे. अधिवेशनादरम्यान विधानसभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या विधानाला जयस्तंभाच्या कब्जेरादाने विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा जयस्तंभ स्मृतिदिन वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.