#MeToo एम.जे. अकबर यांचा अखेर राजीनामा

#MeToo एम.जे. अकबर यांचा अखेर राजीनामा

लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अखेर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी राजीनामा दिला आहे. 20 पत्रकार महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी एम.जे. अकबर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू होती. अखेर अकबर यांनी राजीनामा दिला आहे.

मात्र आपण निर्दोष असून आपली बाजू व्यक्तिगतरीत्या न्यायालयात मांडणार असल्याचं एम.जे. अकबर यांनी स्पष्ट केलंय. आपल्यावरील आरोप खोटे असून याविरोधात न्यायालयात आपण एक व्यक्ती म्हणून लढणार आहोत. त्यामुळे आपल्या पदावरून पायउतार होणंच रास्त वाटत असल्याचं अकबर यांनी जाहीर केलंय. त्याचवेळी देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांचेही त्यांनी आभार मानले.

#MeToo मोहिमेमुळे आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या. यामुळे अनेक बड्या पुरुषांवर आरोप झाले. प्रिया रमाणींपाठोपाठ आणखी 19 स्त्रियांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version