दादर स्टेशन बाहेरील परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती संशयस्पद रित्या एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारत होता. दरम्यान त्याला असं करताना पाहत याची माहिती सकाळी दादर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सकाळी पोलिसांना समजताच तत्काळ क्षणाचा विलंब न करता पोलीस आणि अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनी दिली असून त्याला बिल्डिंग वरून सुरक्षितरित्या उतरवण्यासाठी गेल्या दोन तासापासून रेस्क्यू करायचं काम सुरु आहे. दरम्यान या व्यक्ती दादर स्टेशन परिसरात धुमाकूळ घातला असून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी संयम ठेवत त्याला सुरक्षितरित्या खाली उतरवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.