जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तुम्ही मारुती सुझुकीची कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खूप उपयोगाची आहे. या वाढत्या किमतींमुळे तुमच्या खिशाला चाट पडणार आहे. देशातील सर्वात मोठी कारमेकर कंपनी मारुती सुझुकी आणि होंडा यांनी गाड्यांच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.
मारुती सुझुकीने 1,700 रुपयांपासून 17,000 पर्यंत किमती वाढवल्या आहेत. तर होंडाने 6,000 रुपयांपासून 32,000 दर वाढवले आहेत. दुसरीकडे, टाटा मोटर्सनी 1 जानेवारीपासूनच आपल्या गाड्यांच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.
यंदाच्यावर्षी, 10 जानेवारीपासून मारुती आणि होंडाच्या कारच्या विविध मॉडेल्सवर नव्या किमती लागू केल्या आहेत. प्रशासकीय दर, कच्च्या मालाच्या किमती आणि वितरण खर्च वाढल्यामुळे या कारच्या किमती महागल्याचं सांगण्यात येत आहे.
होंडा कंपनीनेही 8 जानेवारीपासून भारतात तयार केल्या जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या किमती वाढवल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं. ही वाढ 6,000 रुपयांपासून 32,000 पर्यंत आहे.
तर फोर्ड इंडियाने 4% आपल्या कारचे दर वाढवले आहेत. ह्युंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, इसुझू, रेनॉल्ट या कंपन्याही आपल्या किमती याच महिन्यात वाढवणार आहेत. मात्र, अजूनही या कंपन्यांनी आपल्या नव्या किमतींची घोषणा केलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.