Marathi Compulsory: ‘पैसे कमावणार पण मराठी नाही बोलणार!’; उत्तर भारतीय नेत्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांना थेट आव्हान

रिक्षा चालकांच्या मराठी बोलण्यावरून एका उत्तर भारतीय नेत्याचा चिथावणीखोर व्हिडिओ समोर आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Marathi Compulsory: ‘पैसे कमावणार पण मराठी नाही बोलणार!’; उत्तर भारतीय नेत्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांना थेट आव्हान

Marathi Compulsory Auto Permit Row: महाराष्ट्रात ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले असून, मराठी न बोलणाऱ्या चालकांचे परमिट रद्द करण्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 15 ऑगस्ट पासून लागू झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला मराठी भाषेच्या या नियमाचे स्वागत होत असताना, उत्तर भारतीय संघटनांकडून त्याला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. याच मुद्द्यावरून आता एका उत्तर भारतीय नेत्याचा चिथावणीखोर व्हिडिओ समोर आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजय दुबे यांचा व्हिडिओद्वारे परिवहन मंत्र्यांवर जोरदार हल्ला
उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आव्हान दिले आहे. व्हिडिओमध्ये दुबे यांनी उर्मट भाषेत विधान केले की, ‘मी रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी बोलणार नाही.’ 15 ऑगस्ट1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना सरकार आम्हाला पुन्हा गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच सत्तेच्या जोरावर मराठी भाषा लादता येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारच्या इशाऱ्याला ठाम विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा – Nalasopara Crime Cake Shop: नालासोपाऱ्यात 11 जणांना गंभीर विषबाधा! केक खाताना जे दिसलं त्याने सगळ्यांचीच खळबळ उडाली; नेमकं काय घडलं?

‘गुंडगिरी चालणार नाही, सरकार लवकरच कोसळणार’
परिवहन मंत्र्यांच्या निर्णयावर निशाणा साधताना संजय दुबे यांनी महायुती सरकार लवकरच कोसळणार असा दावा केला. ते म्हणाले, ‘हा हिंदुस्थान असून आम्ही प्रेमाच्या भाषेचा आणि मराठी मित्रांचा पूर्ण आदर करतो, परंतु भाषेच्या नावाखाली होणारी भाईगिरी व गुंडगिरी अजिबात सहन केली जाणार नाही.’ आपण उत्तर भारतीय विकास सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सांगत आहोत की, कोणतीही सक्ती किंवा धमकी उत्तर भारतीय तरुण स्वीकारणार नाहीत.

राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता
महाराष्ट्रात ऑटो-रिक्षा परमिटसाठी स्थानिक भाषेची अट आणि मराठी अस्मितेचा विषय नेहमीच अत्यंत संवेदनशील राहिला आहे. अशा काळात थेट परिवहन मंत्र्यांना आव्हान देणारा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. आता या वादग्रस्त विधानानंतर राज्य शासन, परिवहन विभाग आणि स्थानिक मराठी संघटना काय कठोर भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Abhijeet Dipke : शिक्षण व्यवस्थेनंतर आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा नंबर; CJP कडून राज्यव्यापी ‘हॉस्पिटल ठीक करो’ मोहिमेची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version