Rinku Rajguru Dahihandi Celebration: ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का?’; दहीहंडी उत्सवात रिंकू राजगुरूची खास हजेरी, ‘आर्ची’ स्टाईलमध्ये दिली तंबी

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नवी मुंबईतील भव्य दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला होता. आर्ची व्यासपीठावर येताच उपस्थित गोविंदा आणि प्रेक्षकांचा उत्साह पार शिगेला पोहोचला.
Rinku Rajguru Dahihandi Celebration: ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का?’; दहीहंडी उत्सवात रिंकू राजगुरूची खास हजेरी, ‘आर्ची’ स्टाईलमध्ये दिली तंबी

Rinku Rajguru Dahihandi Celebration: मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी विविध ठिकाणी हजेरी लावली. 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नवी मुंबईतील भव्य दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटातील 'आर्ची' या पात्राने महाराष्ट्रातील घराघरांत ओळख निर्माण करणारी रिंकू व्यासपीठावर येताच उपस्थित गोविंदा आणि प्रेक्षकांचा उत्साह पार शिगेला पोहोचला.

'आर्ची'च्या आयकॉनिक डायलॉगने जिंकली उपस्थितांची मनं
कार्यक्रमस्थळी जमलेल्या प्रचंड गर्दीला आणि गोविंदांना शांत राहून खाली बसण्याचे आवाहन आयोजकांकडून सातत्याने केले जात होते. मात्र, वाढत्या गदारोळात कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पाहून रिंकूने माईक हातात घेतला आणि आपल्या प्रसिद्ध 'आर्ची' स्टाईलमध्ये तंबी दिली. 'ए… मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्रजीत सांगू का?' हा तिचा गाजलेला डायलॉग उच्चारताच संपूर्ण मैदानात एकच जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर तिने उपस्थितांना मिश्कीलपणे 'आय लव्ह यू' म्हणत सर्वांची मनं जिंकून घेतली.

हेही वाचा – MNS's Gen-Z Dahi Handi : आधी होकार, आता नकार! दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी अचानक नाकारली परवानगी; मनसे जेन-झी हंडी फुटणार?

कडक उन्हातही गोविंदांच्या ऊर्जेचे रिंकूकडून कौतुक
दहीहंडी सोहळ्यातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना रिंकूने गोविंदा पथकांच्या जिद्दीचे आणि उत्साहाचे भरभरून कौतुक केले. 'इतक्या कडक उन्हातही गोविंदांचा उत्साह आणि ऊर्जा अजिबात कमी झालेली नाही, त्यांचा हाच उत्साह पाहून आपल्यालाही काम करण्याची नवी ऊर्जा मिळते,' अशी भावना तिने व्यक्त केली. सणांच्या या वातावरणात कलाकारांची उपस्थिती आणि रिंकूच्या खास संवादाने दहीहंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

हेही वाचा – Dahi Handi Utsav 2026 : मुंबई, ठाण्यासह जागोजागी रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथके सज्ज, सुरक्षेसाठी प्रशासनाचा विशेष बंदोबस्त

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version