जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासरावला एका टोळीने लाखोचा गंडा घातलाय. स्वत: अनिकेतने फेसबुकवर लाईव्ह येऊन आपली हतबलता व्यक्त केलीय. या टोळीने मदतीच्या नावे लाखो रुपये उकळून, पळ काढल्याचे अनिकेतने म्हटलंय. एक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केस असलेल्या मुलाचा या टोळीत समावेश आहे.
ही टोळी मदतीसाठी याचना करतात. कधी स्वयंसेवी संस्था, तर कधी कॅन्सरग्रस्तांना मदत अशी विविध कारणं देत, ते पैसे उकळतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा, असं आवाहन अनिकेतने केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.