अॅट्रोसिटी कायद्याबाबत सरकारनं जी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि आरक्षणाबाबतचा अहवाल लवकर देण्याची विनंती केली.
मराठा आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका त्यांनी केलीये, तसंच आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या नावानं राजकारणच केलं गेल्याची टीकाही त्यांनी केलीये. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं असंही त्यांनी म्हटलंय.
सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं, जर धमाका झाला तर कोण जबाबदार, विश्वासाला तडा गेला तर काय होणार असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.
उदयनराजे भोसले –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.