मुलीचं प्रेम प्रकरण कळाल्यावर वडिलांनी केले धक्कादायक कृत्य

मुलीचं प्रेम प्रकरण कळाल्यावर वडिलांनी केले धक्कादायक कृत्य

जय महाराष्ट्र,  बुलडाणा

मुलीच्या आंतरजातीय प्रेमाला विरोध करत मुलीच्या बापानं मुलाची जाळून हत्या केलीय आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील मेंढळी गावात ही धक्कादायक घटना आहे.

मुलीचे गावातील अमोल झांबरे या तरुणाशी प्रेमप्रकरण सुरु होतं. अमोल हा दुसऱ्या जातीचा असल्या कारणानं हे प्रेमप्रकरण मुलीच्या वडिलांना मान्य नव्हतं. दोघेही जुमानत नसल्यानं आरोपी सोपान कोल्हेनं अमोलला त्याच्या मामाच्या शेतात नेऊन जाळून टाकलं.

दुसऱ्या दिवशी अमोलचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नातेवाईकांना दिसून आला. पोलीस तपासात आरोपी सोपान कोल्हेला अटक करून त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version