अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषीत

अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे.

 

यापूर्वी ममताविरोधात कोर्टाने अटक वॉरंट बजावलं होते. मात्र, त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला न मिळाल्याने अखेर ठाणे क्राईम ब्रांचनं ममताला फरार घोषित केले.

 

याबाबतची नोटीस पोलिसांनी ममता कुलकर्णीच्या यारी रोडवरली घरावर लावली आहे. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली

असून ती गैरहजर राहिल्यास तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते.

 

दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीसह तिचा पती विकी गोस्वामीही फरार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

 

या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version