Kolhapur News : ‘महाराणी ताराराणी यांचा पराक्रम जीवनाला दिशादर्शक ठरलायं’; वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांचं प्रतिपादन

मेजर स्वाती महाडिक यांना कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराणी ताराबाई छत्रपती 350 वी जयंती वर्ष समितीच्यावतीनं, मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Kolhapur News : ‘महाराणी ताराराणी यांचा पराक्रम जीवनाला दिशादर्शक ठरलायं’; वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांचं प्रतिपादन

अमर पाटील, प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराणी ताराबाई छत्रपती यांच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त, मेजर स्वाती महाडिक यांना आज कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराणी ताराबाई छत्रपती 350 वी जयंती वर्ष समितीच्यावतीनं, मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट तसेच महाराणी ताराबाई छत्रपती 350 वी जयंती वर्ष समिती, यांच्यावतीने महाराणी ताराराणी यांची 350 वी जयंती वर्ष साजरी केली जात आहे. याचं औचित्य साधून, या समितीच्यावतीने जम्मू-काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सातारा येथीस कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांना आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि मेजर जनरल एम. एन. काशीद यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा शाहू फेटा, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन त्यांना गौरवण्यात आले. सुरुवातीला मेजर स्वाती महाडिक यांचे पोलीस बँडची मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विजय पाटील, कर्नल अमरसिंह सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : Kolhapur News : 'प्रचारात महापुरुष, संतांचे फोटो वापरण्यावर बंदी आणा'; हिंदू जनसंघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

महाराणी ताराराणी यांचे शौर्य आणि पराक्रम, प्रत्येकाच्या जीवनाला दिशादर्शक ठरला आहे, असे यावेळी मेजर स्वाती महाडिक यांनी नमूद केले. पती कर्नल संतोष महाडिक यांच्या देश सेवेच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन आपणही देश सेवेचे व्रत स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्नल विक्रम नलावडे, कर्नल विजयसिंह गायकवाड, शिवाजीराव परुळेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा शैलजा भोसले, अवधूत पाटील, बबनराव राणगे, कादर मलबारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version