Karad Tasawade MIDC Blast : 10 किलोमीटरचा परिसर हादरला! इमारतींच्या काचा फुटल्या, धुराचे लोट पसरले; एमआयडीसीतील मोठ्या स्फोटाचे धस्स झालं…

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यात एका एमआयडीसी कंपनीत मोठा स्फोट झाला असून यातून परिसरात धुराचे लोट बाहेर येत आहेत. 
Karad Tasawade MIDC Blast : 10 किलोमीटरचा परिसर हादरला! इमारतींच्या काचा फुटल्या, धुराचे लोट पसरले; एमआयडीसीतील मोठ्या स्फोटाचे धस्स झालं…

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यात एका एमआयडीसी कंपनीत मोठा स्फोट झाला असून यातून परिसरात धुराचे लोट बाहेर येत आहेत. साताऱ्यातील कराड तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की तब्बल दहा किलोमीटरचा परिसर हादरून गेला. भूकंपाचा धक्का बसावा इतका मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. या स्फोटात आजूबाजूच्या इमारतींचा काचा फुटल्या. यावेळी एमआयडीसी कंपनीत काही कामगार देखील आत होते,  मात्र या भीषण स्फोटात कोण जखमी झाले आहे का? हे समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला ही कंपनी कोणती आणि या कंपनीत कोणत्या केमिकलवर काम केलं जात होते हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच परिसरात केमिकलचा उग्र वास पसरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version