Maharashtra Weather Update : ऊन-पावसाचा खेळ सुरूच; आज राज्यातील कोणत्या भागात पाऊस बरसणार; विकेंडला काय स्थिती?

19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी पावासाचा अंदाज देण्यात आला आहे
Maharashtra Weather Update : ऊन-पावसाचा खेळ सुरूच; आज राज्यातील कोणत्या भागात पाऊस बरसणार; विकेंडला काय स्थिती?

गणेशोत्सवाचा उत्साह सुरु असतानाच राज्यातील हवामानातही बदल पाहायला मिळत आहे. आज,19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी पावासाचा अंदाज देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासोबत अधूनमधून ऊनही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात हवामान बदलणार
मुंबई आणि आसपासच्या भागात आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत पाऊस पडू शकतो. त्यानंतर काही काळ वातावरणात सुधारणा होण्याची शक्यता असली, तरी दिवसभर पूर्णपणे हवामान कोरडे राहील. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसाची शक्यता लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील इतर भागांतही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक हवामान बदलू शकत असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा-Pune Accident : ब्रेक फेल झाला अन् काही क्षणांतच घडलं भयंकर; पहाटे नवले पुलाजवळ मोठा अपघात

येत्या काही दिवस राज्यातील हवामान हे ढगाळ आणि दमच राहण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 या दोन्ही दिवशी राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरही काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु राहू शकतात. आज राज्यातील कमाल तापमान हे साधारण 30 ते 33 सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसासोबतच आज काही भागांत उकाडा आणि दमटपणाही जाणवू शकतो.

2009 नंतरचा सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता
याच दरम्यान, देशातील यंदाच्या मॉन्सूनबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. ब्लूमबर्गच्या मिळालेल्या वृत्तानुसार, यंदाच्या मॉन्सून हा गेल्या 17 वर्षांतील सर्वांत कमकुवत ठरण्याची शक्यता आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, जून ते सप्टेंबर या मॉन्सून हंगामात खरं तर देशात सरासरीपेक्षा फक्त 15 टक्केच कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास 2009  नंतरचा सर्वांत कमी पाऊस झालेला मॉन्सून ठरु शकतो. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version