Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आज हवामानाचा लपंडाव! कुठे पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचे वातावरण अजूनही कायम दिसून येत आहे. आज राज्यातील बऱ्याच भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आज हवामानाचा लपंडाव! कुठे पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

महाराष्ट्र :  महाराष्ट्रात पावसाचे वातावरण अजूनही कायम दिसून येत आहे. आज राज्यातील बऱ्याच भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात आज कुठे बरसणार पाऊस?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहर आणि आसपासच्या भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात. मात्र, मुंबईसाठी आज कोणताही मोठ्या प्रमाणात पावसाचा इशार देण्यात आलेला नाही. मुंबई आज कमाल तापमान हे 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.  तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसासोबतच विजांचा कडकडाट होऊ शकतो. बीड, धाराशिव, हिंगोली तसेत जालना, लातून, नांदेड आणि सोलापूर या भागांतही काही ठिकाणी पाऊस तसेच वादळी वारे येण्याची शक्यता हवामाना विभागाने व्यक्त केलेली आहे.

हेही वाचा-शिवसेनेच्या चिन्हाचा वाद कोर्टात पोहोचला, तृणमूल काँग्रेसमध्येही चिन्हाचा पेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत राहू शकतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. विजांचा कडकडाट सुरु असताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आलेले आहे. याच दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील हवामान बदलत राहण्याचीही शक्यता आहे. काही भागांत पाऊस तर काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात पावसाची स्थिती आज ही सारखी राहणार नाही.

मुंबईत आज काय स्थिती राहणार?
मुंबईकरांसाठी आज मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी काही प्रमाणात ढगाळ वातावपण आणि हलक्या सरींची शक्यता आहे, त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी छत्री सोबत ठेवणे फायदेशीर ठरु शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी स्थानिक हवामानाची माहिती लक्षात ठेवावी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version