Today Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या उत्साहात राज्यातील हवामानातही मोठा बदल मिळत आहे. आज 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच भागांतही अनेक भागांत पावसाची शक्यता कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या जिल्हाच्या अंदाजानुसार, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावासाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबईसह रायगडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आज हवामान कसं राहणार?
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आधीच्या अंदाजात व्यक्त केली होती, तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगावमध्येही हलका ते मध्यम पाऊस येणे अपेक्षित आहे. नाशिकच्या घाट परिसरात मात्र मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यात आज हलका पाऊस पडण्याचा अंदाज असून पुणे घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथ्यावरही मध्यम पावसाचा अंदाज सांगितला गेला आहे.
मराठवाड्यात 15 सप्टेंबर रोजी बहुतांश भागात हलका पाऊस अपेक्षित आहे. बीडमध्ये हलका किंवा मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धाराशिवमध्येसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी आज कोणताही विशेष इशार दिला गेला नाही. गडचिरोलीमध्ये मात्र दोन-तीन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिक-शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला
महत्त्वाचे म्हणजे, पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रम, मिरवणुका तसेच प्रवासाचे नियोजन करताना स्थानिक हवामानाचा अंदाज तपासून घ्यावा, कर शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची योग्य काळजी घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.