महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार: राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार: राणे

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

“महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणार आहे,” अशी घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषद राणे बोलत होते.

काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी 1 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. “मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे,” असं नारायण राणेंनी भेटीनंतर सांगितलं.

मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 27 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version