माझा असा फोटो काढा…! शेवटच्या दिवशी अधिवेशनातील मजेशीर क्षण, नेतेमंडळींचा Video Viral

आज विधानसभेची विशेष बैठक असल्याने गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे सकाळीच विधानभवनात दाखल झाले. 
माझा असा फोटो काढा…! शेवटच्या दिवशी अधिवेशनातील मजेशीर क्षण, नेतेमंडळींचा Video Viral

सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. आज विधानसभेची विशेष बैठक असल्याने गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे सकाळीच विधानभवनात दाखल झाले. 

यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावर हेही उपस्थित होते. आपल्या लवाजम्यासह दाखल झालेले गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विधानभवन परिसरात फोटो काढायची इच्छा झाली. फोटो काढताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी फोटोग्राफरला काही सूचना दिल्या. 

हेही वाचा – PM Kisan Yojana : पीएम किसान योजने चा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात? जाणून घ्या नवं अपडेट 

फोटोग्राफर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फोटो काढत नसल्याचे दिसून आले. फोटो मनासारखा येत नसल्याने पंकज भोयर यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. तेथे उपस्थित असलेल्या काही व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरांनीही त्यांना फोटो काढून दाखवले, मात्र तरीही त्यांचे समाधान झाले नाही. 

हेही वाचा – BMC Home Lottery: महापालिकेच्या घरांसाठी दोन हजार अर्ज, पण 53 घरांना ‘नो रिस्पॉन्स’ 

अखेर स्वतः गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीच फोटोग्राफरची भूमिका स्वीकारली. त्यांनी आमदार समीर कुणावर यांचा फोटो काढून दाखवत, अशा पद्धतीने फोटो काढावा, असे फोटोग्राफरला मार्गदर्शन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version